लक्ष्याच्या लेकीचा सोज्वळ लूक, फोटोवर खिळल्या सर्वांच्या नजरा
स्वानंदी बेर्डे ही अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने स्वानंदीने तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
लाल काठ असलेल्या पिवळ्या रंगाच्या साडीत सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे.
स्वानंदीने सिनेसृष्टीला बाजूला सारत स्वत:ची वेगळी वाट निवडली.
स्वत:चा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आणि लक्ष्याची लेक आता बिझनेसवुमन झाली आहे.
'कांतप्रिया' असं ज्वेलरी ब्रँडचं नाव आहे. वडील लक्ष्मीकांत(कांत) आणि आई प्रिया यांच्या नावावरुन हे नाव ठेवलं.