Special OPS 2 मधला ग्लॅमरस मराठी चेहरा...

सध्या गाजत असलेल्या Special OPS 2 मध्ये मराठी अभिनेत्रीचेही कौतुक होत आहे.

कमालीचा फिटनेस आणि अँक्शन स्टंट यामुळे वाहवा मिळवणारी ही मराठी अभिनेत्री म्हणजे सैयामी खेर.

सैयामी खेर ही एक अशी अभिनेत्री आहे, जी कोणत्याही भूमिकेत एकदम फिट बसते.

'मिर्झिया' असो किंवा 'घूमर' असो... सैयामी खेरने आपल्या अभिनयाने वाहवा मिळवली.

सध्या सैयामी लोकप्रिय वेबसिरीज 'स्पेशल ऑप्स'च्या दुसऱ्या भागामुळे चर्चेत आहे.

या वेब सिरीजमध्ये सैयामीने साहसी अंडरकव्हर एजंटची भूमिका चपखल पार पाडली आहे.

साहसी आणि अँक्शन सीन्स असलेले पात्र करण्यासाठी सैयामी कोणतीही कसर सोडत नाही.

या भूमिकेसाठी सैयामी खेरने खास मिक्स्ड मार्शल आर्ट्स (एमएमए) चे प्रशिक्षण घेतले आहे.

'मला नेहमीच अ‍ॅक्शन प्रोजेक्ट्ससाठी शूटिंग करायला आवडते' असे सैयामी आवर्जून सांगते.

Click Here