ग्लॅमरस अवतार पाहून चाहते थक्क!
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक ओळखीचा चेहरा आहे. तिचा अफाट चाहतावर्ग आहे.
आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या सोनालीने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे.
अशातच सोनाली तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.
या नव्या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा फॉर्मल शर्ट आणि त्याला साजेशी काळी फिट पॅन्ट परिधान केली आहे.
केसांचा आकर्षक अंबाडा बांधून, तिने आपल्या या क्लासी लूकला एक परिपूर्ण टच दिला आहे.
सोनाली ही ५१ वर्षाची आहे. वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी आजही तिचे सौंदर्य कोणत्याही तरुण अभिनेत्रीला लाजवेल असेच आहे.