तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता…!

सोनाली बेंद्रेच्या घरी बाप्पा विराजमान

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या घरी यंदाही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

सोनालीनं तिच्या बाप्पाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

सोनालीनं तिचेही  गणपती बाप्पासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये सोनालीने नेसलेल्या साडीने आणि तिच्या आकर्षक लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

 या साडीवर तिने साधे आणि नाजूक दागिने घातले आहेत, जे तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. 

केसात गजरा माळल्यानं आणि कपाळावर चंद्रकोर लावल्याने तिचा हा लूक खूपच मोहक दिसत आहे.

सोनालीने हे फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.

तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत आहे.

Click Here