अप्सराच! सोनाली कुलकर्णीचं निखळ आरस्पानी सौंदर्य
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
सोनालीच्या नव्या फोटोशूटची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
या फोटोशूटसाठी सोनालीने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.
साडीतील लूकवर सोनालीने नथ, झुमके, एका हातात घड्याळ तर दुसऱ्या हातात एक बांगडी आणि गळ्यात मंगळसूत्रासह मोत्यांची माळ परिधान केली आहे.
या फोटोशूटला सोनालीने "गणेशोत्सवासाठी खास"असे कॅप्शन दिले आहे.
चाहत्यांनी सोनालीच्या फोटोशूटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
दरवर्षी सोनालीच्या घरी गणरायाचं आगमन होतं. सोनाली स्वत: तिच्या हाताने बाप्पाची सुंदर मूर्ती घडवते.
यंदाही तिने घडवलेली गणरायाची मूर्ती खूपच खास आहे.