श्रिया पिळगावकरचा मराठमोळा लूक

 फोटो पाहिलेत का?

अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची एकुलती एक लेक श्रियाने इंडस्ट्रीत तिचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

 श्रिया बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येते. मात्र आता तिने मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केलेत.

श्रिया पिवळ्या रंगाच्या साडीत प्रचंड सुंदर दिसतेय. 

नाकात नथ व इतर दागिने परिधान केल्यानं तिचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.

या साडीवर सुंदर साधा ब्लाऊज निवडला आहे.

यावेळी तिने विविध पोज देत फोटो क्लिक केले आहेत.

श्रियाचे हे फोटो सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेत आहेत.

श्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास अलिकडेच तिची 'मंडला मर्डर्स' ही सीरिज प्रदर्शित झाली होती.

श्रिया बॉलिवूडमध्ये रुळली असली तरी तिला पुन्हा मराठीत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Click Here