शेअर केले फोटो
अभिनय आणि कॉमेडीची सांगड घालत टॅलेंटच्या जोरावर शिवाली परबने इंडस्ट्रीत स्थान निर्माण केलं आहे.
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने शिवाली परबने कोल्हापूरच्या अंबाबाई अर्थात महालक्ष्मीचे दर्शन घेतले.
शिवालीने मंदिराच्या परिसरातील आणि देवीच्या दर्शनाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
"ही अक्षय्य तृतीया तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येवो", असं कॅप्शन तिनं फोटोंना दिलं.
पांढऱ्या आणि सोनेरी काठांच्या साडीत शिवाली अत्यंत सुंदर दिसत होती.