सायली संजीवचं लखनवी कुर्तीत फोटोशूट
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव तिच्या साधेपणा आणि सुंदरतेसाठी ओळखली जाते.
अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिच्या नवनवीन लूकचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
नुकतेच सायलीने केलेल्या एका फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सायलीनं गुलाबी रंगाच्या लखनवी कुर्तीत फोटोशूट केलंय.
या फोटोशूटमध्ये सायलीचा लूक अत्यंत क्लासी आणि एलिगंट दिसत आहे.
सायलीचा हा मोहक लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
तिने केलेला मिनिमल मेकअप आणि मोकळे सोडलेले केस तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवत आहे.
तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.