धर्माने मुस्लिम, मनाने शिवभक्त

अभिनेत्री पोहोचली केदारनाथ धाम; पोस्ट शेअर करत म्हणाली...

बॉलिवूडची सुंदर आणि गोड अभिनेत्री सारा अली खान, जी धर्माने मुस्लिम आहे पण मनाने 'महादेव' यांची मोठी भक्त आहे, ती अनेकदा शिव मंदिरांना भेट देताना दिसते. 

अलिकडेच ती पुन्हा एकदा केदारनाथला गेली होती. या आध्यात्मिक प्रवासाची एक झलक तिनं चाहत्यांबरोबर शेअर केली. 

सारा अली खानने केदारनाथ मंदिरात भगवान शंकराचं मनोभावे दर्शन घेऊन आराधन केली.

पोस्टमध्ये तिने केदारनाथबद्दल सांगितले, जे तिच्या हृदयाच्या जवळचे ठिकाण आहे. साराने स्पष्ट केले की, जर जगात असे एक ठिकाण असेल, जे पूर्णपणे तिचे स्वतःचे वाटते, तर ते केदारनाथ आहे.

सारा अली खानने 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केल्याने तिचं या जागेशी खास नातं आहे.

सारा अली खान ही  सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. 

सारा 'सिंबा', 'लव्ह आज कल', 'कुली नंबर १', 'अतरंगी रे' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

ती लवकरच आयुष्मान खुरानाबरोबर 'पती, पत्नी और वो २'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०१९ च्या सुपरहिट 'पती पत्नी और वो'चा सीक्वेल आहे

Click Here