समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तिचे जगभरात लाखो चाहते आहेत. 'अॅक्शन क्वीन' म्हणूनही ती ओळखली जाते.
अभिनेत्रीने आता तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
समांथाने नेव्ही ब्लू रंगाचा आकर्षक मणी असलेला टॉप घातला आहे, ज्यावर हाय-नेक डिटेलिंग केलेलं आहे.
अभिनेत्रीच्या या बोल्ड फोटोंवर चाहते घायाळ झाले आहेत.
हेअरस्टाइलमध्ये तिने केसांचा स्लीक बन बांधला होता, कपाळावर काही बटा सोडून दिल्या होत्या.
न्यूड लिपस्टिकने तिचा पावरफुल लुक अधिक खुलवला.
समांथाच्या कामाबद्दल बोलायचं झाल तर ती लवकरच "मा इंती बंगाराम' या तेलुगू चित्रपटातून आणि 'रक्त ब्रह्मांड' या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.