साधेपणावर चाहते फिदा!
अभिनेत्री साई पल्लवी नेहमीच पडद्यावरील ग्लॅमरपासून दूर राहून आपले साधे जीवन जगते.
चित्रपटांच्या शूटिंगमधून ब्रेक घेत साई पल्लवी सध्या एका सुंदर आणि शांत ठिकाणी व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
तिने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
नेहमीप्रमाणेच या फोटोंमध्येही साई पल्लवी अगदी नो-मेकअप लुकमध्ये दिसत आहे.
तिचा नैसर्गिक ग्लो आणि स्माईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
यावेळी तिची बहीण पूजा तिच्यासोबत दिसली. दोघी बहिणी एन्जॉय करत आहेत.
साई पल्लवीची बहीण अगदी तिच्यासारखीच दिसते.
साई पल्लवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती 'रामायण'मध्ये माता सीतेची भूमिका साकारत आहे.
'रामायण' हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून, त्याचा पहिला भाग २०२६ मध्ये रिलीज होणार आहे.