रिंकू राजगुरूच्या घरचा लाडका बाप्पा!

फोटो पाहिलेत का?

अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या तिच्या गणेशोत्सवातील फोटोंमुळे चर्चेत आहे. 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रिंकूने मोठ्या उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं आहे. 

तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिच्या लूकनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

या फोटोंमध्ये रिंकूने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. 

या फोटोत ती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसलेली दिसतेय.

या पारंपरिक वेशभूषेवर तिने साजेसे दागिने घातले आहेत आणि केसात गजरा माळला आहे. 

तिचा हा साधेपणा आणि पारंपरिक लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. 

रिंकूच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

Click Here