दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.
तिच्या या खास दिवशी सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
५ एप्रिल १९९६ रोजी कर्नाटकच्या विराजपेटमध्ये जन्मलेली रश्मिका आज ३० वर्षांची झाली आहे.
रश्मिकाने २०१६ मध्ये 'किरिक पार्टी' या कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटांनी तिला रातोरात स्टार बनवले.
लवकरच ती 'कॉकटेल २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कॉकटेल २'मध्ये रश्मिका मंदानासोबत शाहिद कपूर आणि क्रिती सनॉन दिसणार आहेत.
दरम्यान, अलिकडेच रश्मिकानं २६ फेब्रुवारी २०२६ रोजी विजय देवरकोंडासोबत राजस्थानमधील उदयपूर येथे थाटामाटात लग्न केले.