फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी (Rasha Thadani) तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
नुकतेच तिने काही खास फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
राशाने परिधान केलेल्या आउटफिटवर संपूर्णपणे बारीक चकाकणारे सिक्विन वर्क आहे.
मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअपमुळे तिचा हा लूक एखाद्या राजकन्येसारखा दिसत आहे.
राशाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.
राशानं 'आझाद' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
आता लवकरच तिचा 'लाइकी लाइका हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हा एक हिंदी रोमँटिक-ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये राशासोबत 'मुंज्या' फेम अभय वर्मा मुख्य भूमिकेत आहे.