अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाच्या ऐतिहासिक यशामुळे जगभरात चर्चेत आहे.
अवघ्या ५ दिवसांत ८०० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटासाठी रणवीरनं ५० कोटी रुपये इतकं मानधन घेतलं असल्याचं बोललं जातं.
सध्या रणवीरच्या नेटवर्थचीही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२६ पर्यंत रणवीर सिंगची एकूण संपत्ती अंदाजे ३७० ते ४०० कोटी रुपयांच्या घरात आहे.
चित्रपटांचे मानधन, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि स्वतःच्या गुंतवणुकीतून तो दरवर्षी कोट्यवधींची कमाई करतो. त्याची वार्षिक कमाई केवळ जाहिरातींतूनच ७०-८० कोटींच्या आसपास असते.
रणवीरचं मुंबईतील वांद्रे परिसरातील सागर रेशम अपार्टमेंटमध्ये ११९ कोटी रुपयांचे भव्य क्वाड्रप्लेक्स घर आहे. याशिवाय प्रभादेवी आणि अलिबागमध्येही त्यांची कोट्यवधींची मालमत्ता आहे.
रणवीर सिंगकडे टोयोटा लँड क्रूझर, मर्सिडीज मेबॅक GLS 600, जग्वार XLJ, मर्सिडीज बेंझ E क्लास, लँबोर्गिनी आणि अॅस्टन मार्टिन रॅपिड S अशा आलिशान गाड्या आहेत.
रणवीर सिंगने केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता स्वतःचे 'Incvink' नावाचे म्युझिक लेबल सुरू केले आहे. तसेच त्याने अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे त्याची संपत्ती सातत्याने वाढत आहे.
रणवीर सिंगचा पहिला चित्रपट 'बँड बाजा बारात' होता, ज्यातून तो थेट प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. त्यानंतर त्याने एकापेक्षा एक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.