"२ मुलांनी एकाच वेळी डेटवर बोलवलं, मी मांजरीवर..."

नेमकं काय म्हणाली अभिनेत्री राधिका आपटे? 

राधिका आपटे ही बॉलिवूडमधील अत्यंत बोल्ड अँड ब्यूटीफुल अभिनेत्री आहे. 

कपिल शर्माच्या शोमध्ये राधिकाने तिच्या डेटिंग लाईफबद्दल मजेदार किस्सा सांगितला होता. 

"दोन मुलांनी एकाच दिवशी, एकाच वेळी डेटवर बोलावलं. काय करू असा मी विचार करत होते." 

"माझ्या रुममेटने मांजरीला खाऊ घाल आणि विचार कर असा सल्ला दिला."

"मांजरीसाठी एका भांड्यात ट्यूना होता आणि दुसऱ्या भांड्यात दुसरा मासा होता."

"ट्यूना बेनेडिक्ट होता आणि दुसरा मासा मायकल होता. मांजर जे पहिलं खाईल त्याच्यासोबत डेटवर जाईन."

"मांजरीने ट्यूना खाल्ला, मी बेनेडिक्टसोबत डेटवर गेली. त्याच्यासोबतच मी लग्न केलं" असं राधिकाने म्हटलं.

ब्यूटी विद ब्रेन! 'ही' लोकप्रिय अभिनेत्री सॉफ्टवेअर इंजिनिअर

Click Here