लाडकी लेक अन् नवरा निकसोबत प्रियंकाचा एन्जॉय

 शेअर केले काही सुंदर फोटो

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा सध्या तिच्या व्यावसायिक यशासोबतच कौटुंबिक आयुष्याचाही भरभरून आनंद घेत आहे. 

नुकतेच प्रियंकाने सोशल मीडियावर मार्च महिन्यातील आपले आवडते काही खास फोटो शेअर केले आहेत. 

यामध्ये ती मुलगी मालती मेरी सोबत निवांत वेळ घालवताना दिसत आली. 

प्रियंकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंना "Random March" (मार्चमधील काही सहज क्षण) असे कॅप्शन दिले आहे. 

 निक जोनास गाडी चालवताना दिसत असून, चिमुकली मालती त्याच्या मांडीवर बसलेली आहे. 

ऑस्करच्या ग्लॅमरस सोहळ्यादरम्यान निकसोबत घेतलेला तिचा सेल्फी चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

 प्रियंका या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात 'प्रेझेंटर' म्हणून सहभागी झाली होती. 

प्रियंकाचे हे फोटो सध्या चर्चेत आले आहेत.

Click Here