प्रियंका चोप्राच्या ऑल-ब्लॅक 'बॉम्बशेल' लूकला चाहत्यांची पसंती
बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या फॅशनचा जलवा दाखवणारी ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा जोनास पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश अवतारामुळे चर्चेत आली आहे.
प्रियंकाने नुकताच एक धमाकेदार 'ऑल-ब्लॅक' लूक कॅरी केला आहे, जो सध्या फॅशन जगतात धुमाकूळ घालत आहे.
तिने परिधान केलेला आउटफिट हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध डिझायनर रॉबर्टो कावाली यांनी डिझाइन केलेला आहे.
हा ऑल-ब्लॅक आउटफिट प्रियंकावर खूपच खुलून दिसला. तिचा क्लासी आणि पॉवरफुल अवतार यातून दिसून आला.
हा 'ऑल-ब्लॅक' लूक पूर्ण करण्यासाठी तिने बुल्गारी या प्रसिद्ध लक्झरी ब्रँडच्या दागिन्यांचा वापर केला.
यासोबतच सनग्लासेस परिधान करुन तिने आपल्या लूकला परफेक्ट फिनिशिंग दिलं.
प्रियंकाच्या या जबरदस्त लूकमागे बॉलिवूडची प्रसिद्ध स्टायलिस्ट अमी पटेल हिचा हात आहे.
प्रियंकानं हा लूक तिच्या आगामी 'वाराणसी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केला होता.