फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.
मौनी अभिनयासोबतच तिच्या उत्कृष्ट फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
नुकतंच मौनीनं साडीत एक अतिशय सुंदर फोटोशूट केलं आहे.
ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मोकळे केस, मोजकेच दागिने आणि तिचा कातिल अंदाज यामुळे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
मौनीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी 'ब्युटी क्वीन', 'ग्लॅमरस नागिन' आणि 'अतिशय सुंदर' अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
या फोटोशूटमध्ये तिने दिलेले हावभाव तिच्या सौंदर्याला अधिकच उठाव देत आहेत.
वेस्टर्न असो वा देसी, मौनी प्रत्येक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसते.