कतरिना कैफ कोणत्या महिन्यात बाळाला जन्म देणार?

लग्नाच्या चार वर्षांनंतर विकी-कतरिना होणार आई-बाबा!

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या आयुष्यात चिमुरड्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

लग्नाच्या चार वर्षांनंतर कतरिना कैफ-विकी कौशल आईबाबा होणार आहेत.

कतरिना आणि विकी कौशल यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे दोघांचा एक क्युट फोटो शेअर करीत आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. 

तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसत आहे. आधीपेक्षाही ती आणखी सुंदर दिसत आहे. 

अभिनेत्रीनं ही बातमी देताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी कतरिना बाळाला जन्म देणार आहे. 

कतरिना ही "तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये" आहे. याचा अर्थ अभिनेत्री तिच्या गर्भधारणेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातून जात आहे.

कतरिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म देऊ शकते. 

विकी आणि कतरिना यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास, त्यांनी त्यांच्या डेटिंगबद्दलही जाहीरपणे कधीच सांगितलं नव्हतं.

 २०२१ च्या वर्षअखेर थेट लग्न करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिलेला. राजस्थानमध्ये झालेल्या या शाही लग्नात केवळ कुटुंबीय आणि जवळची मित्रमंडळी उपस्थित होती.

Click Here