इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
जान्हवी कपूर ही हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे.
नुकतंच तिनं तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. यावेळी तिनं केलेल्या दाक्षिणात्य लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.
जान्हवी कपूर या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे. तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्राही होता.
हिरव्या आणि जांभळ्या रंगाची साडी परिधान करुन जान्हवीने साजशृंगार केला आहे.
जान्हवीने तिची आई श्रीदेवी यांच्यासोबतचा फोटो शेअर केलाय. काल श्रीदेवी यांचा वाढदिवस होता.
श्रीदेवी या दक्षिण भारतातील होत्या. त्यांच्या अनेक प्रथा-परंपरांचं पालन करताना जान्हवी दिसून येते.
जान्हवी कपूर तिची आई श्रीदेवी यांच्या खूपच जवळ होती. पण तिचा पहिला चित्रपट 'धडक' रिलीज होण्याआधीच श्रीदेवी यांनी या जगाचा निरोप घेतला होता.
सध्या जान्हवी तिचा आगामी चित्रपट 'परमसुंदरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या २९ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.