मराठमोळी, थोडीशी साधी-भोळी!

जान्हवी किल्लेकरचा सुंदर लूक, डिझायनर ब्लाऊजने वेधलं लक्ष!

'बिग बॉस'मधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिचा चाहतावर्ग मोठा आहे.

जान्हवी किल्लेकर आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळते.

आता जान्हवी किल्लेकर हिने पैठणीतील खास फोटो शेअर केले आहेत.

मनमोहक आणि दिलखेचक अदांनी तिने चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केले आहे.

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ आणि केसात गजरा माळलेली जान्हवी प्रचंड सुंदर दिसतेय. 

या शाही लुकला साजेसे असे दागिने देखील तिने कॅरी केले आहेत.

तिचा हा लूक अनेकांना आवडला असून, चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत.

केशरी पैठणीतील जान्हवी किल्लेकरच्या सुंदरतेवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.

जान्हवीने परिधान केलेल्या गुलाबी ब्लाऊजवर 'वक्रतुंड' असे कॅलिग्राफीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे.

Click Here