नताशाचं नवं फोटोशूट व्हायरल
नताशा स्टँकोव्हिच आपल्या फॅशन सेन्सने नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
नुकतेच नताशा स्टँकोव्हिचने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
या नव्या लूकमध्ये नताशा एखाद्या राजघराण्यातील राजकुमारीसारखी दिसत आहे.
नताशाने आपल्या लेटेस्ट फोटोशूटसाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला इंडो-वेस्टर्न आउटफिट निवडला.
तिने सोनेरी रंगाचा ब्रॅलेट आणि लांब, फ्लोअर-लेंथ स्कर्ट परिधान केला. त्यावर सुंदर 'मिरर-वर्क' असलेल्या जॅकेटनं तिच्या या लूकला अधिक आकर्षक बनवलं.
नताशाचं एकदम टोन्ड स्लीम अँड ट्रीम फिगर ठेवली आहे. ज्याचं चाहते कायम कौतुक करतात.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यापासून वेगळं झाल्यानंतर नताशानं आपल्या कामावर आणि फॅशन करिअरवर लक्ष केंद्रित केलं आहे.