जिनिलिया देशमुखचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली? 

दोन मुलांची आई, पण अजूनही लाखो दिलांची धडकन

बॉलिवूडमधील गोड आणि हसतमुख चेहरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे जिनिलिया देशमुख.

विलासराव देशमुख यांची सून आणि रितेश देशमुखची पत्नी जिनिलिया ही केवळ अभिनेत्री नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात स्थान मिळवलेली लाडकी वहिनी आहे.

 जिनिलिया डिसूजाच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. जिनिलियाने बॉलिवूड, तेलगू, तमिळ आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.

आज जिनिलियाचा वाढदिवस आहे. 

५ ऑगस्ट १९८७ रोजी जन्मलेली जिनिलिया आज ३८वा वाढदिवस साजरा करतेय.

 सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

जिनिलियाने २००३ मध्ये तिने रितेश देशमुखसोबत 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

चित्रपटात एकत्र काम करत असतानाच जिनिलिया आणि रितेशमध्ये प्रेम फुललं. जवळपास ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी विवाह केला.

आज ते दोन मुलांचे पालक आहेत.  ५ नोव्हेंबर २०१४ ला पहिला मुलगा रियानचा जन्म झाला तर १ जून २०१६ रोजी राहिलचा जन्म झाला.

Click Here