फिटनेस क्वीनचे 'हॉट' फोटो पाहून चाहते झाले वेडे
बॉलिवूडची फिटनेस क्वीन दिशा पाटनी पुन्हा एकदा आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.
दिशाने तिच्या सोशल मीडियावर लाल रंगाच्या 'वनपीस'मधील काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.
मोकळे केस, ग्लॉसी मेकअप आणि कॅमेऱ्यासमोर दिलेल्या तिच्या कातिल अदांनी या फोटोंची रंगत अधिकच वाढवली आहे.
दिशाचा हा 'रेड हॉट' लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्या वयाचा अंदाज बांधताना दिसून येत आहेत.
दिशा पाटनीचा जन्म १३ जून १९९२ रोजी झाला असून तिचे वय ३३ वर्षे आहे.
ती उत्तर प्रदेशातील बरेलीची असून, तिने 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी २' यांसारख्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे.
सध्या दिशा तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत आली आहे. तिचं नाव लोकप्रिय गायक तलविंदर सिंगशी जोडलं जात आहे.