नवं फोटोशूट पाहून चाहते घायाळ!
अभिनेत्री आकांक्षा चमोला सध्या चर्चेत आली आहे.
आकांक्षा ही टीव्ही स्टार आणि 'बिग बॉस १९'चा विजेता गौरव खन्नाची पत्नी आहे.
नुकतंच आकांक्षानं खास फोटोशूट केलंय.
काळ्या रंगाच्या कॉर्सेट गाऊनमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय.
तिचा हा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
अनेक जण तिच्या या स्टायलिश अवतारावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
आकांक्षा तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते.
ती सोशल मीडियावर नियमितपणे स्वतःचे फोटो शेअर करत असते, ज्यातून तिचा फॅशन सेन्स स्पष्ट दिसून येतो.