हे' ५ भन्नाट सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट एकदा पाहाच 

शेवटपर्यंत खिळवून ठेवतील, अजिबात चुकवू नका

जर तुम्हाला डोकं चक्रावून सोडणारे ट्विस्ट, सस्पेन्स आणि रहस्याने भरलेले चित्रपट आवडत असतील, तर जाणून घेऊया अशा ५ चित्रपटांबद्दल ज्यांनी प्रेक्षकांना थक्क केले आहे.

'वश: लेव्हल २' या नावानेही ओळखला जाणारा हा चित्रपट २०२३ मधील सुपरहीट 'वश'चा सिक्वेल आहे. या चित्रपटाला ७.९ IMDb  रेटिंग आहे.

आर. माधवन, अपारशक्ती खुराना आणि ख्याती खंडेलवाल यांच्या मुख्य भूमिका असलेला 'धोका: राऊंड द कॉर्नर' हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या थ्रिलरला IMDb वर ६.२ रेटिंग मिळाले आहे.

'हसीन दिलरुबा' हा रोमँटिक मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे. या चित्रपटाला ६.९ IMDb रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग 'फिर आयी हसीन दिलरुबा' प्रचंड लोकप्रिय आहे. 

अनन्या पांडे आणि विहान सम्राट अभिनित 'CTRL' हा आजच्या डिजिटल युगातील धोक्यांवर भाष्य करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाला ६.२ रेटिंग मिळाले आहे.

परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत असलेला 'द गर्ल ऑन द ट्रेन' हा चित्रपट पॉला हॉकिन्स यांच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे. 

Click Here