विराट कोहलीच्या एका लाईकनं पोरीचे रातोरात 'इन्स्टा'वर वाढले होते फॉलोअर्स
अवनीत कौरने लहानपणीच झगमगत्या विश्वात पदार्पण केलं होतं. आता अवनीत बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
सोशल मीडियावर अवनीत कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
आताही तिनं काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अवनीतने अतिशय सुंदर असा पिवळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे.
अवनीत कौरच्या या फोटोशूटला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
अवनीत कौरचा जन्म १३ ऑक्टोबर २००१ ला पंजाबच्या जालंधर शहरात झाला होता. सध्या तिचं वय २३ आहे.
अलिकडेच विराटनं तिचा फोटो लाईक केल्यानंतर ती प्रचंड चर्चेत आली होती. तिच्या फॉलोअर्समध्येही मोठी वाढ झाली होती.
तिचा फोटो लाईक केल्यानंतर विराटनं त्याच्या इन्स्टा स्टोरीवरून स्पष्टीकरणही दिलं होतं. हे लाईक त्याने स्वतः केलं नव्हतं, तर इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे ते झालं, असं त्यानं म्हटलं होतं.