अभिनेता ५८ वर्षांचा तर शूरा फक्त...
अभिनेता अरबाज खान हा वयाच्या ५८ व्या वर्षी बाबा झाला आहे.
अरबाजची दुसरी पत्नी शुरा खानने ५ ऑक्टोबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे.
शुरा खान व अरबाज खान आता एका मुलीचे आई-बाबा झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच अरबाज आणि शूराने आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली होती.
शूरा ही अरबाजची दुसरी पत्नी आहे. अरबाजने शूरासोबत २०२३ मध्ये निकाह केला होता.
शूराआधी अरबाजने मलायकासोबत १९९८ मध्ये संसार थाटला होता. पण २०१७मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना २२ वर्षांचा अरहान हा मुलगादेखील आहे.
आता अरबाज आणि शूराला कन्यारत्न प्राप्त झाल्यानं खान कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
अरबाज खान ५८ वर्षांचा आहे तर शूरा ३५ वर्षांची आहे. त्या दोघांमध्ये २२ वर्षाचं अंतर आहे.