ही फिल्म 'धुरंधर' प्रमाणेच एक वॉर फिल्म असून तीही सत्य घटनांवर आधारित
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
'धुरंधर २' चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ९०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
यातच आता आदित्य धरची एक ७ वर्ष जुनी फिल्म OTT वर पुन्हा चर्चेत आली आहे.
तो चित्रपट आहे उरी: द सर्जिकल स्ट्राईक.
ही फिल्म २०१६ मध्ये काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे.
या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. त्यानं चित्रपटात मेजर विहान सिंह शेरगिल ही भूमिका साकारली आहे.
'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाला ४ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.
सध्या हा चित्रपट ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून टॉप ट्रेंडिंगमध्ये स्थान मिळवत आहे.