उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी आलिया भट तिच्या हटके फोटोशूट आणि लूकमुळेही चर्चेत येत असते.
अलिकडेच आलिया भट हिने नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
आलिया ऑरेज रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसतेय.
तीचा चेहरा कोणत्याही मेकअपशिवाय झळकतोय, आणि तिचं हास्य खुलून दिसतंय.
आलिया कायम सोशल मीडियावर नो मेकअप लूकमधील फोटो शेअर करत असते.
चाहतेही तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करतात.
आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात विकी कौशल आणि पती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.
तसेच ती 'अल्फा' या चित्रपटातही दिसरणार आहे. यामध्ये तिच्यासोबत शर्वरी वाघही आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे आणि २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.