आलियाच्या सुंदरतेला तोड नाही, प्रत्येक लूकमध्ये ती चाहत्यांचं काळीज चोरते.
अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या सगळ्यात सर्वांना आकर्षित केलंय कपूर कुटुंबाची सून म्हणजे आलिया भट हिने.
आलियाच्या दिवाळी सेलिब्रेशनच्या फोटोंनी सोशल मीडियावर एकच धुमाकुळ घातला आहे.
आलियाचे दिवाळी पार्टीतील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
सोनेरी रंगाच्या साडीत आलिया प्रचंड सुंदर दिसत होती.
हा लूक आणखी युनिक आणि सुंदर बनवण्यासाठी आलियाने डीप नेक ब्लाउज निवडला होता. त्यावर स्टायलिश जॅकेट परिधान केलं.
आलियाने तिचे केस मोकळे सोडले होते. तर मांग टिक्का लावून लूक पूर्ण केला होता.
मिनिमल मेकअपमुळे तिचा हा 'गोल्डन लूक' अधिकच खुलून दिसत होता.
करीना कपूरच्या दिवाळी पार्टीसाठी तिनं हा खास लूक केला होता.