शूटींग सेटवरच पडले होते प्रेमात, आता घटस्फोट घेणार?
लोकप्रिय टेलिव्हिजन जोडी ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट सध्या चर्चेत आहेत.
सध्या दोघांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं बोललं जातं. ऐश्वर्या आणि नील दोघेही सध्या वेगळे राहत आहेत.
या जोडीने ३० नोव्हेंबर २०२१ रोजी उज्जैनमध्ये अतिशय थाटामाटात लग्नगाठ बांधली होती.
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती.
ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट यांच्या वयात पाच वर्षांचे अंतर आहे. दरम्यान, घटस्फोटाबद्दल दोघांनी अद्याप अधिकृत भाष्य केलेलं नाही.