गेम ऑफ थ्रोनमधील 'हे' पॉवरफुल कोट्स बदलतील तुमचा दृष्टीकोण

GOT हा टीव्ही शो सर्वाधिक गाजला तो त्याच्यातील दर्जेदार डायलॉग्सनी...

ज्यावेळी तुम्ही सिंहासनाचा खेळ खेळता त्यावेळी एकतर तुम्ही जिंकता किंवा मरता... इथं आधलं मधलं काही नसतं.
 - सर्सी लॅनिस्टर 

एका सिंहाला एखाद्या शेळीच्या मताची चिंता नसते. 
- टायविन लॅनिस्टर 

जो मनुष्य शिक्षा सुनावतो त्यानंच तलवार देखील चालवली पाहिजे.
- नेड स्टार्क

तू कोण आहेस हे कधीही विसरू नकोस कारण जग ते विसरत नाही. तुझी ओळख चिलखत म्हणून धारण कर. ते तुम्हाला दुखावण्यासाठी कधीही वापरले जाऊ शकत नाही. 
- टीरियन लॅनिस्टर 

जो पुरूष मी राजा आहे असं आवर्जुन सांगतो तो खरा राजा नसतो.
 - टायविन लॅनिस्टर 

अराजकता हा काही एखादा खड्डा नाहीये. अराजकता ही एक शिडी आहे.
- लॉर्ड बेलिश 

ताकद तिथंच असते जिथं एखाद्या व्यक्तीला वाटतं की ती तिथं आहे. ही एक ट्रिक आहे. भींतीवरच्या सावलीसारखी... एक छोटा मनुष्य देखील एक मोठी सावली निर्माण करू शकतो. 
- लॉर्ड वॅरिस 

ज्यावेळी अनेक लोकं खोटी आश्वासनं देतात त्यावेळी शब्दांना काही अर्थ उरत नाही. त्यानंतर कोणतंही उत्तर नसतं फक्त मिळतो उत्तम खोटेपणा आणि खोटेपणा लढाईत काही कामाचा नसतो. 
- जॉन स्नो 

एका लांडग्याला जिवंत सोडा... एकही शेळी सुरक्षित असणार नाही. 
- आर्या स्टार्क 

Click Here