उर्मिला मातोंडकरचा 'पिंक बार्बी' लूक
बॉलिवूडची 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर पिंक रंगाच्या ड्रेसमधील एक खास फोटोशूट शेअर केलं आहे.
या फोटोशूटमध्ये उर्मिला कमालीची ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत आहे.
उर्मिलाने एका आकर्षक पिंक रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे. तिच्या या 'गुलाबी' लूकला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं आहे.
अभिनेत्रीने या फोटोंना 'पिंक बार्बी' अशी कॅप्शन दिलंय आणि खरंच तिचा हा अंदाज पाहता, वय हा फक्त एक आकडा आहे, हे सिद्ध होतं.
वयाच्या पन्नाशीतही तिने तिशीतील अभिनेत्रींना टक्कर दिली आहे. तिच्या या किलर लूकवरून चाहत्यांची नजर हटत नाहीये.
उर्मिला मातोंडकरने बॉलिवूडसह मराठी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त,ती आता राजकारणातही सक्रिय झाली आहे.