राधा ही बावरी...

सुखदाने नुकतेच सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. जे चर्चेत आले आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुखदा खांडकेकर. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांमुळे ती अल्पावधीत लोकप्रिय झाली.

सुखदा मराठीसह हिंदी मालिका विश्वातही सक्रीय आहे. आजवर तिने अनेक गाजलेल्या हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

सुखदा सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफचे अपडेट चाहत्यांना देत असते.

सुखदाने नुकतेच सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. जे चर्चेत आले आहे.

या फोटोशूटमध्ये सुखदाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केला. त्यावर निळ्या रंगाचा दुप्पट्टा घेतला आहे आणि डोक्यावर मोरपंखी रंगाची चुनरी ओढली आहे.

लेहंग्यावर साज श्रृंगार करून अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केलाय. तिच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.

Click Here