अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती
अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान चर्चेत असते. सध्या तिचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
सुहाना देखील आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत सिनेइंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमावत आहे.
जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
नुकतेच सुहानाने तिचा भाऊ आर्यन खानच्या द बॅड्स ऑफ बॉलिवूडच्या सीरिज लाँचवेळीच्या गेटअपमधील फोटो शेअर केले आहेत.
यात सुहाना खानने पिवळ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे. यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.
सुहाना खानने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.