सुहाना खान बऱ्याचदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत येत असते.
सुहाना खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टारकिड आहे.
सुहानाने द आर्चिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. यातील तिच्या कामाचं कौतुक झालं होतं.
सुहाना प्रोजेक्टशिवाय तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. आताही तिचा लेटेस्ट लूक चर्चेत आलाय.
भाऊ आर्यन खानची पहिली वेबसीरिज बॅड्स ऑफ बॉलिवूडच्या प्रीव्ह्यू लाँचवेळी सुहाना हजर होती. यावेळी तिने तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतले.
यावेळी सुहाना खानने गुलाबी आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये फुलांचा टॉप आणि काळा स्कर्ट घातला होता. हा आउटफिट तिला खूप छान दिसत होता.
सुहाना खान तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असते, आता पुन्हा एकदा ती चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी झाली आहे.