रिम-झिम गिरे सावन...

स्पृहा जोशीने पावसात हटके फोटोशूट केलंय.

आजवर स्पृहा जोशीने वेगवेगळे मराठी सिनेमे, नाटक तसेच मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

आपल्या सहज सुंदर अभिनयाने  स्पृहाने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते. त्याद्वारे स्पृहा तिचे नवनवीन फोटोज, व्हिडीओ शेअर करते. तसेच तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल चाहत्यांना माहिती देत असते.

नुकतेच स्पृहा जोशीने पावसात फोटोशूट केलंय. यावेळी तिने हिरव्या रंगाच्या शेडमधील साडी नेसलीय आणि मोठे सिल्वर इअररिंग्स घातले आहेत.

फोटोशूटमध्ये स्पृहा खूपच छान दिसते आहे. तिने खूप छान पोझ दिली आहे.

स्पृहा जोशी या फोटोत पावसाचा मस्त आनंद लुटताना दिसतेय. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

Click Here