अभिनेत्रीने यंदा आपला वाढदिवस अत्यंत खास आणि अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीकडे पाहिलं जातं.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने यंदा आपला वाढदिवस अत्यंत खास आणि अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
सोनाली कुलकर्णीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बाईक राईड करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने एक पोस्टही लिहिली आहे.
सोनालीने पोस्टमध्ये लिहिले की, "माझा वाढदिवस असा दिसत आहे... माझं स्वप्न जगत आहे! बाईकिंग ३ दिवसांची मोहीम..."
"स्वतःशी पुन्हा कनेक्ट होण्यासाठी थोडा वेळ काढत आहे. खूप गरज होती याची! तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद! ", असे तिने पोस्टमध्ये लिहिले.
सोनालीने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून ब्रेक घेत, वाढदिवसानिमित्त ३ दिवसांची बाईक मोहीम आखली आहे.