सोनाली खरेच्या नऊवारी साडीतल्या फोटोंना मिळतेय पसंती
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करत असते.
सोनाली खरे लवकरच छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे.
स्टार प्रवाहवर दाखल होणारी नवीन मालिका नशीबवानमध्ये सोनाली निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.
सोनालीने नुकतेच स्टार प्रवाहच्या गणेशोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या गेटअपमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
या इव्हेंटसाठी सोनालीने मराठमोळा लूक केला होता. नववारी साडी नेसली होती.
नववारी साडीत सोनाली खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.