सोनाली बेंद्रेचे शिमरी साडीतले फोटो चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सध्या सोनाली सिनेविश्वात फारशी सक्रीय नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
सोनाली सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा फोटोशूट शेअर करत असते.
नुकतंच सोनाली बेंद्रेने इंस्टाग्रामवर शिमरी साडीतले फोटो शेअर केले आहेत.
सोनालीने साडीवर डायमंड इअररिंग्स आणि बोटात डायमंड रिंग्स घातले आहेत. केस मोकळे सोडून लूक पूर्ण केलाय.
सोनाली बेंद्रेने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
तिच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.