ग्लॅमरस लूकमध्ये सोनाली कुलकर्णीने वेधलं चाहत्यांचं लक्ष
सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.
सोनाली कुलकर्णी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
सोनाली कुलकर्णी हिने निळ्या रंगाच्या आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. यात तिने निळ्या रंगाचा डायमंड नेकलेस घातला आहे.
सोनाली कुलकर्णीने या आउटफिटमध्ये वेगवेगळे पोझ दिल्या आहेत.
या फोटोत सोनाली अप्सरेसारखीच दिसत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.