छबीदार सुरत देखणी,
नार गुलजार..! 

श्वेता राजनचा पारंपारिक लूक चर्चेत

'मन झालं बाजिंद' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री श्वेता राजन घराघरात पोहचली.

झी मराठी वाहिनीवरील या मालिकेत श्वेताने 'कृष्णा' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

सध्या श्वेता लाइमलाइटपासून दूर आहे. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना अपडेट्स देत असते.

श्वेता राजन हिने नुकतीच इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने लाल रंगाची नववारी साडी नेसलीय

लाल रंगाच्या साडीवर श्वेता राजनने पारंपारिक लूक केला आहे. तिने हातात हिरव्या बांगड्या घातला आहे.

केसांचा आंबाडा बांधून चाफ्याची फुलं माळली आहेत. गळ्यात नेकलेस घालून तिने लूक पूर्ण केला आहे.

श्वेता राजनने लाल नववारी साडीत खूप छान पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

श्वेता राजनच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

श्वेता राजन शेवटची पारू मालिकेत दिसली होती.

Click Here