एकटीच आहे करोडो रुपयांची मालकीण!
अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. वयाच्या ३८व्या वर्षीही अभिनेत्री सिंगल आहे.
एकटे आयुष्य जगणारी श्रद्धा चाहत्यांची आवडती आहे. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या स्टार्सच्या यादीतही तिचं नाव अव्वल आहे.
श्रद्धाचं मुंबईतील जुहू येथे घर आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, या घराची किंमत ६० कोटी रुपये आहे.
लाईफस्टाईल एशियाच्या रिपोर्टनुसार, श्रद्धाची एकूण संपत्ती १२३ कोटी रुपये आहे. ती एका चित्रपटासाठी ५ ते ७ कोटी रुपये मानधन घेते.
एवढेच नाही तर जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी ती मोठी रक्कम देखील घेते. श्रद्धाकडे अनेक आलिशान गाड्या आहेत.
लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर सध्या अभिनेत्रीचं नाव लेखक राहुल मोदी याच्याशी जोडलेलं आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.