शिव ठाकरे आपल्या साधेपणामुळे कायमच प्रेक्षकांचं मन जिंकतो.
अमरावतीचा वाघ मराठमोळा शिव ठाकरे आपल्या साधेपणामुळे कायमच प्रेक्षकांचं मन जिंकतो.
शिव ठाकरेने मराठी बिग बॉसची ट्रॉफीही जिंकली होती.
यानंतर तो 'खतरो के खिलाडी', 'बिग बॉस हिंदी'सह अनेक रिएलिटी शोजमध्ये दिसला.
सध्या शिव ठाकरे दुबईत आहे आणि तिथले फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नुकतेच शिवने बुर्ज खलिफामधील फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्याने व्हाइट रंगाचा शर्ट आणि पॅण्ट घातली आहे.
गॉगल लावून शिवने त्याचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोत त्याचा डॅशिंग अवतार पाहायला मिळत आहे.
शिव ठाकरेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.