दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी शिल्पा आजही तितकीच लोकप्रिय आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैंकी एक आहे.
बॉलिवूडची देखणी आणि अतिशय फिट अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी ओळखलं जातं.
नव्वदच्या दशकात हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री या ना त्या कारणाने चर्चेत असते. वयाच्या पन्नाशीतही शिल्पा तिचं सौंदर्य आणि फिटनेस टिकवून आहे.
शिल्पा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. बऱ्याचदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोंनीं नेटकऱ्यांसह सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
यात तिने लाल रंगाचा स्कर्ट आणि टॉप को-ऑर्ड सेट घातला आहे. यात ती खूपच स्टनिंग दिसते आहे.
फोटो शेअर करत शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले की, शिल्पा नहीं... फायर हूँ में...