शरयू सोनावणे अभिनयासोबत तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत येत असते.
शरयू सोनावणे मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती पारू मालिकेत काम करताना दिसते आहे.
पारू मालिकेत तिने साकारलेली पारू प्रेक्षकांना खूपच भावली आहे. तिने रसिकांच्या मनात घर केलंय.
शरयूने नुकतेच स्टार प्रवाहच्या गणेशोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या सुंदर लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
शरयूने या कार्यक्रमात पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर फुल स्लीव्हजचा पिंक रंगाचा ब्लाउज परिधान केलाय.
तिने साडीवर गळ्यात मोत्यांचा नेकलेस परिधान केलाय आणि मोत्यांचे कानातले घातले आहेत.
केस मोकळे सोडून शरयूने तिचा लूक पूर्ण केलाय. साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसतेय.