सध्या सौम्या टंडन तिच्या 'धुरंधर' या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे.
सध्या सौम्या टंडन तिच्या 'धुरंधर' या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींचा विचार केला, तर त्यात सौम्या टंडन हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
'भाबीजी घर पर हैं' या गाजलेल्या सिटकॉम मालिकेतील 'गोरी मॅम' म्हणजेच अनिता नारायण मिश्रा ही तिची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
सध्या सौम्या टंडन तिच्या 'धुरंधर' या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सौम्याने तब्बल ५ वर्षांनंतर अभिनय क्षेत्रात दमदार पुनरागमन केले आहे.
'धुरंधर' चित्रपटात तिने 'रहमान डकैत' (अक्षय खन्ना) याच्या पत्नीची, म्हणजेच 'उल्फत'ची भूमिका साकारली आहे.
सौम्या टंडन खऱ्या आयुष्यात ती अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असतात.
नुकतेच सौम्याने सोशल मीडियावर काश्मीरी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.