रिंकू राजगुरूने पीच रंगाच्या साडीत केलं फोटोशूट
रिंकू राजगुरूने पहिल्याच सिनेमातून चांगलीच लोकप्रियता मिळवली. हा सिनेमा म्हणजे सैराट. या सिनेमानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.
सैराटनंतर रिंकूने आणखी बऱ्याच सिनेमात काम केलं. तसेच हिंदी वेबसीरिजमध्येही ती झळकली.
रिंकू सिनेमाशिवाय तिच्या लूकमुळेही चर्चेत येत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर पीच रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरूने पीच रंगाच्या साडीत मरीन ड्राइव्ह येथे फोटोशूट केलंय. साडीवर तिने मिनिमल मेकअप आणि केस मोकळे सोडले आहेत.
रिंकू राजगुरूच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.